Friday, April 3, 2026

प्रोटीन पावडरचे प्रकार - कोणासाठी कोणते योग्य

  

 प्रोटीन पावडरचे प्रकार – कोणासाठी कोणते योग्य?

आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर्स उपलब्ध आहेत. पण प्रत्येक प्रोटीन सर्वांसाठी योग्य असतेच असे नाही. आपल्या शरीराची गरज, वय, पचनशक्ती आणि जीवनशैली यानुसार योग्य प्रोटीन निवडणे खूप महत्त्वाचे असते.

 आता प्रोटीनचे प्रमुख प्रकार पाहू.

1.प्लांट प्रोटीन (Plant Protein)

हे प्रोटीन वनस्पतींपासून मिळते.

• स्रोत: - धान्ये, कडधान्ये, डाळी, मूग, चणा, मसूर, सोया, राजमा, हरभरा,बिया,भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया इत्यादी

प्लांट प्रोटीन हे Pea protein, rice protein, soy protein अशा पावडर स्वरूपातही मिळते 

• वैशिष्ट्ये: - प्लांट प्रोटीन पचायला तुलनेने हलके आणि फायबर जास्त असल्यामुळे पोटासाठी चांगले, शिवाय पूर्णपणे शाकाहारी 

कोणासाठी योग्य: - सर्वसामान्य लोक, डायबेटीक्स, वजन कमी करणारे, ज्यांना पचनाचा त्रास होतो अशा सर्वांसाठी प्लांट प्रोटीन योग्य.

2. व्हे प्रोटीन (Whey Protein)

हे प्रोटीन दुधापासून बनवले जाते.

वैशिष्ट्ये: - हे प्रोटीन शरीरात पटकन शोषले जाते. खास करून स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त

व्हे प्रोटीन मध्ये तीन प्रकार दिसतात.

1.Concentrate - या प्रकारात 70–80%प्रोटीन असते. सर्वसामान्य व्यक्तीसाठी इतक्या प्रोटीनची गरज नसते, हे जिम किंवा फिटनेस करणाऱ्यांसाठी योग्य.

2. Isolate - या प्रकारात 90%+ प्रोटीन असते, खेळाडू किंवा जिम करणाऱ्यांसाठी योग्य, सर्वसामान्य लोकांसाठी हे गरजेचे नाही.

3. Hydrolysate - हायड्रोलाइज्ड प्रोटीन - हे खूप पटकन शरीरात जाते. प्रोफेशनल अ‍ॅथलीट्स किंवा सर्जरीनंतर recovery साठी दिले जाते. सर्वांसाठी आवश्यक नाही. तुलनात्मक दृष्ट्या महागही असते.

सर्वसामान्य व्यक्तीसाठी काय योग्य?

घरगुती प्लांट प्रोटीन, मोड आलेली कडधान्ये डाळी, कडधान्ये, बिया इत्यादि .

नैसर्गिक अन्नातून मिळणारे प्रोटीन हेच सर्वात सुरक्षित प्रोटीन आहे.

थोडक्यात म्हणजे

“महाग प्रोटीन म्हणजेच चांगले प्रोटीन” असं समजायचं कारण नाही. 

आपल्या स्वयंपाकघरात असलेले कडधान्य, बिया आणि धान्ये यामध्येच आपल्या शरीरासाठी योग्य प्रोटीन दडलेले आहे. अर्थात हे जरी खरे असले तरी अन्नातून - विशेषतः शाकाहारी अन्नातून पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळतेच असे नाही. त्यामुळे थोडे अतिरिक्त प्रोटीन रोज घेणे गरजेचे आणि नक्कीच फायदेशीर ठरते.

 पुढच्या भागात कोणते प्रोटीन कोणासाठी योग्य, कोणी आणि किती घ्यायचे इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती घेऊ.


Sunday, March 29, 2026

अतिरिक्त प्रोटीन किती आणि कधी घ्यावं

 🌿 अतिरिक्त प्रोटीन कधी आणि किती घ्यावं? 

आपण पाहिलं की आपल्याला रोज किती प्रोटीन आवश्यक असतं.

पण आता प्रश्न येतो — अतिरिक्त प्रोटीन कोणी घ्याव, कधी घ्याव आणि त्याची खरंच गरज असते का ?

सगळ्यांनाच अतिरिक्त प्रोटीनची गरज असते असे नाही पण काही परिस्थितीत शरीराला अतिरिक्त प्रोटीनची गरज भासते: उदा -

 • व्यायाम किंवा जास्त शारीरिक हालचाल असल्यास - स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी

• वय वाढल्यावर - शरीराचे झीज भरून निघावी आणि स्नायू कमी होऊ नयेत म्हणून

•मधुमेह असताना - ताकद टिकवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी

• आजारीपणातून उठल्यावर - शरीर लवकर recover होण्यासाठी

आणि 

• विशेषतः शाकाहारी लोकांसाठी - कारण शाकाहारातून मिळणाऱ्या प्रोटीनच प्रमाण थोडं कमी आणि गुणवत्ताही(quality) थोडी कमी असू असते, त्यामुळे अनेक वेळा शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन मिळू शकत नाही. अशा वेळी थोडं अतिरिक्त प्रोटीन घेणं फायदेशीर ठरत. पण अतिरिक्त म्हणजे किती ? 

तर -

सर्वसाधारण व्यक्तीसाठी दररोज साधारण 10–15 ग्रॅम अतिरिक्त प्रोटीन घेणं आवश्यक आणि पुरेस असत.

जास्त प्रोटीन घेतलं तर?

पचनावर ताण येऊ शकतो

किडनीवर ताण पडू शकतो (विशेषतः आधीपासून त्रास असेल तर).

“जास्त प्रोटीन म्हणजे जास्त फायदा” असं नाही" 


अतिरिक्त प्रोटीन घेताना शक्यतो नैसर्गिक स्रोतांना प्राधान्य द्यावे आणि जर जेवणातून पुरेसं प्रोटीन मिळत नसेल, तर विश्वासार्ह प्रोटीन पूरक (supplement) वापरण्याचा विचार करावा.

 पुढच्या भागात आपण जाणून घेऊ प्रोटीनचे नैसर्गिक स्त्रोत

Saturday, March 28, 2026

दररोज किती प्रोटीन आवश्यक

 🌿 आपल्याला दररोज किती प्रोटीन आवश्यक आहे?

आपण प्रोटीन किती महत्त्वाचं आहे हे पाहिलं…पण आता प्रश्न येतो — आपल्याला रोज किती प्रोटीन घ्यायला हवं? याचे उत्तर तुमचं तुम्हीच काढू शकता.

साधारणपणे,आपल्या वजनाच्या प्रति किलोमागे 0.8 ते 1 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं.

उदाहरणार्थ:जर तुमचं वजन 60 किलो असेल,तर तुम्हाला दिवसाला अंदाजे 48 ते 60 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे.  अर्थात वेगवेगळ्या गटांसाठी प्रोटीनची गरज वेगवेगळ्या कारणासाठी कमी जास्त असू शकते. 

उदाहरणार्थ

 लहान मुलं (growth साठी): शरीर वाढत असल्यामुळे प्रोटीन खूप महत्त्वाचं, साधारण 1 ग्रॅम प्रति किलो

 स्त्रिया: दैनंदिन आरोग्यासाठी आणि हार्मोन्स संतुलनासाठी अंदाजे  0.8 ते 1 ग्रॅम प्रति किलो

 पुरुष: स्नायू टिकवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी -0.8 ते 1 ग्रॅम प्रति किलो (व्यायाम असेल तर जास्त)

ज्येष्ठ नागरिक: वय वाढल्यावर स्नायू कमी होऊ नयेत म्हणून 1 ते 1.2 ग्रॅम प्रति किलो

गर्भधारणा आणि डिलिव्हरीनंतर: बाळाच्या वाढीसाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रोटीन आवश्यकआणि डिलिव्हरीनंतरही (विशेषतः स्तनपान करताना): आईच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि बाळासाठीप्रोटीनची गरज अजून वाढते

एक महत्त्वाची गोष्ट -एकाच वेळी खूप प्रोटीन घेण्यापेक्षा दिवसातून योग्य प्रमाणात विभागून घेणं जास्त फायदेशीर

थोडक्यात

योग्य प्रमाणातील प्रोटीन = ताकद, ऊर्जा, चांगलं आरोग्य 

🌼 उद्या आपण पाहूया - अतिरिक्त प्रोटीनची गरज 

Friday, March 27, 2026

प्रोटीन ची खरी ओळख आणि महत्त्व

 🌿 प्रोटीन म्हणजे नेमकं काय?

आपण रोज “प्रोटीन घ्या” असं ऐकतो, पण प्रोटीन म्हणजे नेमकं काय?

प्रोटीन हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

तो लहान लहान घटकांपासून (अमिनो आम्लांपासून) बनलेला असतो. ही अमिनो आम्ले म्हणजे शरीराच्या बांधकामासाठी लागणारी “वीट” आहेत असं समजा.

आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, केस, नखं, तसेच अनेक अवयव — हे सगळं प्रोटीनपासून तयार होतं.

🌼 प्रोटीनची मुख्य कामं:

स्नायू मजबूत ठेवणे आणि वाढवणे

शरीराची झीज भरून काढणे (repair work)

शरीराला ताकद आणि ऊर्जा देणे

रोगप्रतिकारशक्ती वाढवणे (immunity मजबूत करणे)

हार्मोन्स आणि एन्झाईम्स तयार करण्यात मदत करणे

आपण रोज चालतो, काम करतो, व्यायाम करतो — या सगळ्यात शरीरात थोडीफार झीज होत असते. ही झीज भरून काढण्याचं महत्त्वाचं काम प्रोटीन करतं.

विशेषतः वय वाढल्यावर शरीरात प्रोटीन शोषण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन घेणं अधिक गरजेचं होतं.

तसंच, मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं.

म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश असणं अत्यावश्यक आहे.

🌼 उद्या आपण पाहूया — आपल्याला दररोज किती प्रोटीन आवश्यक असतं?

Thursday, March 26, 2026

रामनवमी विशेष - न्यूट्रीनेस्ट प्रोटीन पावडर च्या प्रवासाची सुरुवात

🌼 रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एक नवीन सुरुवात 🌼
नमस्कार 🙏
आज रामनवमीच्या पवित्र दिवशी मी एक नवीन प्रवास सुरू करत आहे —
आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारा आणि योग्य पोषणाची माहिती देणारा.
गेली अनेक वर्षे मी आहार, विशेषतः दैनंदिन जीवनात रोजच्या आहारात प्रोटीनचे महत्त्व, याचा अभ्यास करत आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आहारात प्रोटीनची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. याचा परिणाम थकवा, स्नायूंची कमजोरी, वजनात वाढ, आणि विशेषतः मधुमेहासारख्या आजारांवर होतो.
याच पार्श्वभूमीवर मी घरच्या घरी एक विशेष शाकाहारी प्रोटीन पावडर तयार करत आहे.
ही पावडर पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असून, शरीराला आवश्यक पोषण देण्याचा माझा प्रयत्न आहे.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढील गोष्टी सांगणार आहे:
👉 प्रोटीनचे आपल्या शरीरातील खरे महत्त्व
👉 कोणत्या वयात किती प्रोटीन आवश्यक आहे
👉 मधुमेहींसाठी योग्य आहार आणि प्रोटीनचे स्थान
👉 माझ्या प्रोटीन पावडरमधील प्रत्येक घटकाचा उपयोग
👉 घरच्या घरी हेल्दी ड्रिंक्स आणि रेसिपीज
👉 आणि सर्वात महत्त्वाचे — सोप्या भाषेत, रोजच्या आयुष्यात वापरता येईल अशी माहिती
माझा उद्देश फक्त प्रोटीन पावडर विकणे नाही,
तर प्रत्येकाला योग्य माहिती देऊन त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम करणे हा आहे.
तुमचा पाठिंबा आणि प्रेम मिळत राहो, हीच अपेक्षा 🙏
धन्यवाद!
— सुधा कुलकर्णी